कोलगाव मारुती मंदीर परिसरात गटार बांधकामाचा शुभारंभ

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते झालं भूमिपूजन
Edited by: विनायक गांवस
Published on: April 11, 2023 17:26 PM
views 143  views

सावंतवाडी : कोलगांव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोलगांव मारूती मंदीर, काजरकोंड या ठीकाणी पावसाळयामध्ये पुरस्थिती निर्माण होऊन घरामध्ये पाणी शिरते. त्यामुळे त्या ठीकाणी रस्त्याच्या बाजूने गटर बांधणे गरजेचे असल्याने हे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेले आहे. त्या कामाचे भूमिपूजन भाजपचे युवा नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कोलगांव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, ग्रा.प.सदस्य संदिप हळदणकर, आत्माराम चव्हाण, हेमांगी मेस्त्री, चंदन धुरी, बलवंत कुडतरकर, सुरेश दळवी, संजय पाटणकर, फ्रॅन्की डॉन्ट्स, रूपेश कुडतरकर, अक्षय वेंगुर्लेकर,महादेव सावंत, अब्दुल साठी, सांगेलकर कुटुंबीय, स्नेहा चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.