मळेवाड नदी पात्रात सात फूट लांबीची मगर

Edited by: विनायक गांवस
Published on: June 20, 2024 11:58 AM
views 316  views

सावंतवाडी : मळेवाड (चराटकरवाडी) येथील नदी पात्रात साधारण सहा ते सात फूट लांबीची मगर सध्या ग्रामस्थांच्या दृष्टीत पडत आहे. मळेवाड चराटकरवाडी येथील ग्रामस्थ  गणपती विसर्जन करण्यासाठी ज्या ठिकाणी नदी पात्रात जातात त्याच ठिकाणी ही मगर दृष्टीत पडत आहे. तसेच या मगरीची पिल्ले सुद्धा दृष्टीत पडत आहेत. या नदीपात्रा शेजारी येथील ग्रामस्थांची तसेच  बाजूच्या वाड्यातील शेतकऱ्यांची शेती असल्याने येथील शेतकरी, त्यांची गुरे ही या नदीपात्रात जात असतात. कपडे धुण्यासाठी येथील महिला या नदीपात्रात जात असतात. त्यामुळे सध्या या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागीलवेळी सुद्धा मळेवाड पुलानजिक  शेतकरी शेती करत असताना  त्यांना सुद्धा  अशाच प्रकारच्या मगरीचे दर्शन झाले होते. आज साधारण दुपारच्या वेळी येथील शेतकरी, निवृत्ती चराटकर, सखाराम चराटकर यांच्या निदर्शनास  ही मगर पडली. संबधित खात्याने लवकरात लवकर या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ, शेतकरी करत आहेत.