
सावंतवाडी : तालुक्यातील सात दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात सात दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. विसर्जनस्थळी मोठी गर्दी केली होती.
गेले सात दिवस आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या. शुक्रवारी सायंकाळपासून सात दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. सात दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था त्यांनी केली. लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जनस्थळी मंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. पुष्पवृष्टी नंतर लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला.
दरम्यान, ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात सात दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मोठ्या थाटामाटात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या.तर भातशेतीतून डोक्यावरून गणपती विसर्जनस्थळी घेऊन जातानाचा क्षण अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला. तलाव, पाणवठे आदी ठिकाणी लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असं वचन घेत निरोप देण्यात आला.