बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच

Edited by:
Published on: May 13, 2024 14:17 PM
views 450  views

बांदा : मुंबई गोवा महामार्गवर बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सायंकाळी मोटारीची छोट्या टेम्पोला धडक बसली. वाहतूक कोंडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

   याठिकाणी पुलाचे काम सुरु असल्याने दररोज अपघात होत आहेत. सुट्टीचा हंगाम असल्याने दररोज वाहनांची वर्दळ वाढत आहे. आज सायंकाळी मोटारीची टेम्पोला पाठीमागून धडक बसली. यामध्ये मोटारीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. अपघाताची बांदा पोलिसात नोंद करण्यात आली नाही.