आंबा - काजू नुकसान भरपाईसाठी वेगळे निकष करण्यात यावे : विलास रूमडे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 05, 2024 10:01 AM
views 381  views

देवगड : कोकणातील आंबा काजू बागायतीचे नुकसान भरपाई मिळण्याकरता वेगळे निकष तयार करण्यात यावे व त्या अनुषंगाने तयार करण्यात येणाऱ्या समितीवर प्रगतशील तज्ञ शेतकरी निवडण्यात यावेत, तसेच पीक विम्याची कालावधी १ ऑक्टोबर ते ५ जून असा करण्यात येऊन त्या पीक विम्याचा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना फळबागायतदारांना मिळावा. तसेच जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ठिकाणी आंबा फळ मार्केट यार्ड निर्माण करण्यात यावे. जेणेकरून कोकणातील आंबा व अन्य फळांना योग्य भाव मिळून शेतकरी फळबागायतदार हे आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. असे प्रतिपादन आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ देवगडचे अध्यक्ष विलास रुमडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

यावेळी संघाचे पदाधिकारी, सदस्य रामदास अनभवणे, नाना गोडे,सत्यवान गावकर,सुधाकर वाळके,इंद्रनील कर्वे,संकेत लब्दे,गुरुनाथ राणे,रुपेश सोमले,संजय धुरी,विष्णू तांबे,धनंजय गोडे उपस्थित होते. या अनुषंगाने बोलत असताना रुमडे म्हणाले. आंबा पीक संरक्षण साठी असलेले निकष हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक असतील असे असावे. त्यामध्ये आवश्यक ते नवीन निकष समाविष्ट असावेत.

येथील बदलत्या हवामानानुसार उत्पत्ती होणाऱ्या कीटक कीड प्रादुर्भाव तसेच बागायतींना फायदेशीर ठरणारी कीटकनाशके जी शासन मान्य व ज्याचा शेतकऱ्यांना अपॆक्षित फायदा होईल अशी उपलब्ध व्हावीत.. देवगड तालुक्यात अद्ययावत संशोधन स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण करण्यात यावी. अवकाळी पाऊस, थ्रीप्सचा मोठ्या प्रमाणात बागायतीवर झालेला परिणाम, वातावरणात वेळोवेळी होणारे बदल व फळमाशीचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा झालेल्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानापोटी अधिकाधिक शासकीय मदत.देण्यात यावी.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ निर्माण व्हावि. शेतकऱ्यांना आवश्यक ते नवनवीन तंत्रज्ञान मार्गदर्शन नवीन आव्हाने स्वीकारण्याची व मानसिकता बदलासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन व्हावे, सद्यस्थितीत वाढती स्पर्धा मोठी असून प्रतवारी दर्जा राखणे आव्हान असून परावलंबित्व प्रत्येक शेतकऱ्याने कमी करावे व सर्वांनी संघटित होऊन शासकीय योजना मार्गदर्शन याचा फायदा घ्यावा.असे आवाहनही या निमित्ताने केले.