शिक्षक दिनी वेंगुर्ला रोटरी क्लब कडून जेष्ठ शिक्षकांचा सन्मान..!

Edited by: दिपेश परब
Published on: September 07, 2023 13:26 PM
views 43  views

वेंगुर्ला : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लेच्या वतीने जेष्ठ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मिडटाऊनचे सेक्रेटरी योगेश नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात गेली ३० वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या वेंगुर्ला हायस्कूलचे निवृत्त क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर तसेच शाळा वेंगुर्ले नं १ च्या सेवाज्येष्ठ कार्यतत्पर आणि अभ्यासू शिक्षिका गायत्री बागायतकर यांचा सन्मान करण्यात आला.

क्रीडक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांच्या घरी जाऊन, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन, सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, क्लब व्हाईस प्रेसिडेंट ॲड. प्रथमेश नाईक, इव्हेंट चेअरमन आनंद बोवलेकर, ट्रेझरर पंकज शिरसाट, रो. मुकुल सातार्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.