कणकवलीत ज्येष्ठ फोटोग्राफरचा सत्कार !

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 19, 2023 19:59 PM
views 596  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रमध्ये जागतिक फोटोग्राफी दिन साजरा होत आहे. त्यानिमित्तानेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये फोटोग्राफर संघटनेच्या वतीने ज्येष्ठ फोटोग्राफर यांचा सत्कार करत जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला. यावेळी  फोटोग्राफर रमाकांत निमकर, विलास गुडेकर, दिलीप काळसेकर यांना शाल त्रिफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले.

यावेळी तालुका फोटो संघटना अध्यक्ष विनायक पारधीये, उपाध्यक्ष संजय राणे, सचिव कृष्णा कांबळी, कायदेशीर सल्लागार संतोष सावंत, विनोद दळवी,संजोग सावंत, मारुती मेस्त्री, सुरजीत ढवण, सत्यविजय गुडेकर, राजू सोहनी , नितीन कोळेकर, आनंद काळसेकर, गणेश लुडबे उपस्थित होते.