
सावंतवाडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात गवळी तिठा येथे ज्येष्ठ नेते अण्णा केसरकर यांनी आत्मक्लेश आंदोलन छेडले. या आंदोलनात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सहभागी होत पाठिंबा दर्शविला. राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अमानास्पद भाष्य केले होते. या विरोधात हे आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्यां विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती कारवाई करणार ? असा सवाल अण्णा केसरकर यांनी केला आहे .
या आंदोलनात अँड. दिलीप नार्वेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, महेंद्र सांगेलकर, मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, रवी जाधव, देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, इफ्तेकार राजगुरू आदी उपस्थित होते.