
कणकवली : कणकवली शहरातील गांगोवाडी येथील रहिवासी तथा ज्येष्ठ पत्रकार आनंद विठ्ठल अंधारी (९३) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. अंधारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्न व समस्यांना आपल्या लेखनीतून वाचा फोडली. सामाजिक, सांस्कृतीक,शैक्षणिक तसेच धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. सिंधुदुगर्जना साप्ताहिकच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनेतेचा आवाज बले होते. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्वभाव होता. उत्तम लेखन हा त्यांचा विशेष गुण होता. कणकवलीतील विद्यामंदिर प्रशालेला त्यांनी दिलेल्या २ लाखांच्या आर्थिक मदतीतून प्रशालेत पाचवी ते दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जायचा. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राज इलेक्ट्रिकचे मालक प्रदीप व राज मोबाईलचे मालक संतोष अंधारी यांचे ते वडील होत.