ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान

Edited by:
Published on: April 13, 2025 18:39 PM
views 224  views

सावंतवाडी : दै. लोकसत्ता, दै. रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना जाहीर झालेला कोकण मराठी पत्रकार संस्थेचा 'पत्रकार भूषण पुरस्कार २०२५'  प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर, वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलरजा रोकडे यांच्या हस्ते या  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रत्नागिरी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 

कोकण मराठी पत्रकार संस्थेचा प्रथम वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा 'पत्रकार भूषण पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर, वसई-विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलरजा रोकडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच इतर  'कोकणरत्नां'चा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. अध्यक्षीय मनोगत ज्येष्ठ पत्रकार, तथा दैनिक ‘प्रहार’चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु संजय भावे, महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर, कोकण मराठी पत्रकार संस्थे'चे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष संतोष धोत्रे, प्रमुख कार्यवाह दिलीप देवळेकर, संयुक्त कार्यवाह दिलीप शेडगे, उपाध्यक्ष श्रीकांत चाळके आदी मान्यवर उपस्थित होते.