
देवगड : देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे व्यवस्थापक संतोष पाटकर यांना ६० वर्षे पूर्ण झालेबद्दल त्यांचा रविवार दिनांक ०८ डिसेंबरला सांस्कृतिक भवन जामसंडे येथे सन्मान करण्यात आला. यावेळी समारंभासाठी संस्थेचे विद्यमान संचालक सुधीर जोशी, विद्याधर माळगांवकर, संस्थेचे माजी कर्मचारी राजेंद्र शेट्ये, सदाशिव भुजबळ व संस्थेच्यामाजी संचालिका रेश्मा जोशी इ. तसेच संस्थेचे आजी माजी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक पु.ज. ओगले तथा काका ओगले यांनी संस्थेच्या संचालक पदावरून नियत वयोमानानुसार स्वेच्छा निवृत्ती स्विकारल्याने दिक्षीत फाउंडेशन चे निरंजन दीक्षित व देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेच्या वतीने शाल,श्रीफळ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. तसेच व्यवस्थापक संतोष पाटकर व संचालक काका ओगले यांचे संस्थेमध्ये मोलाचे योगदान असल्याने त्यांचा सन्मान करत असल्याचे संचालक. निरंजन दीक्षित व अध्यक्ष अॅड.अजित गोगटे यांनीआपल्यामनोगतामध्ये व्यक्त केले.हापूस आंब्यामध्ये कामकरणारी व ऑनलाईन पद्धतीने आंबा विक्री करणारी संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थाअसल्याचे दीक्षित यांनी यावेळी बोलताना सांगितले.