आला पेशंट की पाठवा गोव्याला

महाविकास आघाडीचं ढोल बजाओ आरोग्य यंत्रणा सुधारो आंदोलन
Edited by:
Published on: October 14, 2024 07:11 AM
views 746  views

सिंधुदुर्ग : "आला पेशंट की पाठवा गोव्याला" अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची  झालेली आहे. कोणताही पेशंट आला की गोव्याला पाठविण्याच्या पलीकडे कोणतेही काम शासकीय मेडिकल कॉलेज करत नाही. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे -फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरु आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर  गेल्या तीन वर्षात शिंदे -फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाही,नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही.

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत,वसतीगृहाची व्यवस्था केलेली नाही,अपुरे कर्मचारी वर्ग,अपुरा औषधपुरवठा, सिटीस्कॅन मशीन बंद,शस्त्रक्रिया होत नाहीत त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे - फडणवीस सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत  याविरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने उद्या आज   सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर "ढोल बजाओ आरोग्य यंत्रणा सुधारो"आंदोलन केल आहे.