
रुपेश रटाटे
रोहा : सेम्परट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा २२वा वर्धापन दिन
मोठ्या उत्साहात गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाला. यानिमित्ताने वार्षिक स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात दोन वर्ष खंडित राहिलेला वर्धापन दिन या वर्षी मात्र मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित कंपनीचे साईड मॅनेजर रुतेश जोशी यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करत असताना कंपनीच्या वार्षिक अहवाल सादर करून कंपनीच्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केले.
आगामी काळात कारखान्याला जर नंबर १ बनवायचे असेल तर कामगारांचे महत्वाचे योगदान पुढील काळात असणार आहे. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य कंपनी कामगारांना येणाऱ्या काळामध्ये नक्की करेल. तर कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर आराम करून चालणार नाही. कंपनीच्या वाढीसाठी नवनवीन उपकरणे पुरविण्याचे काम सध्या चालू आहे. आपण दरवर्षी दिलेले वर्क पूर्ण करतो. याचे श्रेय उपस्थित कामगारांचे आहे, असा उल्लेखही यावेळी आवर्जून केला. येणाऱ्या काळात नवनवीन प्रकल्प हातात घेऊन, कमी वेळेत जास्त टार्गेट कसे साध्य करू शकतो, आणि कामगारांच्या सहकार्याचे भविष्यात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो, याबद्दल विश्वास साईड मॅनेजर रुतेश जोशी यांनी व्यक्त केला.
या वार्षिक वर्धापन दिनाला उपस्थित कंपनीच्या एचआर हेड जान्हवी मॅडम यांनी येणाऱ्या काळात कामावर गैरहजर न राहण्याचे आवाहन उपस्थित कामगारांना केले. तर कोविडच्या काळात आपण वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करू शकलो नाही. परंतु आता हा सोहळा आनंदात याच्यापुढे अविरतपणे चालू राहील, असे प्रतिपादन केले. व्यवस्थापनाकडून उपस्थित साईड मॅनेजर जोशी , एचआरच्या हेड जान्हवी मॅडम, सेल्स हेड विरेंद्र मिश्रा, फायनान्स हेड धर्मेंद्र शाह , प्रोडक्शन इंजिनियर डिपार्टमेंट हेड अमित धार, सेफ्टी मॅनेजर सत्यदेव पांडे, अमर सल्ला गरे, सारिका देशमुख, विशाल गावंड, निशा खिरीट, किरण मोरे, चेतन पाटील, निशांत, नाना पाटील आदी स्टाफ उपस्थित होते.
यावेळी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रात श्री सत्यनारायणाची पूजा पूर्ण झाल्या नंतर दुपारी संगीत भजन, लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस कार्यक्रम, तर महिलांसाठी संगीत खुर्ची, होम मिनिस्टर आयोजित करण्यात आले होते. रात्री आगरी कोळी गाण्याच्या तालावर प्रत्येकाने ठेका धरला. मनोरंजनाच्या या विविध कार्यक्रमात विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर सलगरे यांनी केले. व्यासपीठावर उपस्थित युनियन प्रतिनिधी अध्यक्ष गितेश रटाटे, उपाध्यक्ष मिथुन मालुसरे, सेक्रेटरी नितेश बामुगदे, खजिनदार निलेश भोकटे, दिलीप कडव, मनोज भोकटे, महेंद्र दिघे आदी प्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले.
