
कणकवली : कणकवली शहरातील एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत घरातच गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी कणकवलीत रहदारी असलेल्या भागामध्ये ही घटना घडली. फेसबुक लाईव्हद्वारे हे सर्व करत असताना तेथीलच नजीकच्या एकाने फेसबुक लाईव्हवर ही घटना पाहिली व त्यांनी तेथील अन्य काहींना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्या भागातील अनेकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खोलीचा आतून बंद असलेला दरवाजा धक्का मारून उघडत खोलीत प्रवेश केला. मात्र तोपर्यंत तो तरुण अत्यवस्थ झाला होता. त्यानंतर काही वेळातच त्या तरुणाचा गळफास सोडवत त्याला तातडीने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दुचाकी वरूनच नेण्यात आले. त्याच्यावर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार किरकोळ भांडणातून कणकवली शहरात राहणाऱ्या या चालक म्हणून काम करणाऱ्या या तरुणाने आज दुपारी 3 वा. च्या सुमारास घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून घेत फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला. गळफासाची दोरी गळ्यात घातल्यानंतर त्याने फेसबुक लाईव्ह वर सर्वांना बाय-बाय देखील केले. फेसबुक लाईव्ह द्वारे हा सर्व प्रकार तो आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून करत असताना तेथील शेजाऱ्याने एकाने फेसबुकवर ही घटना पाहिली व त्याने तेथील अन्य काही लोकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी त्याच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली मात्र खोलीचा दरवाजा बंद असल्याने तो उघडण्याकरिता काही वेळ गेला. काही वेळाने दरवाजा धक्का मारून उघडून खोलीत प्रवेश केला. परंतु तो पर्यत तो तरुण अथ्यवस्थ झाला होता. यानंतर तेथील तरुणांनी त्याला त्याच स्थितीत दुचाकीवर ठेवून खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु या घटनेची कणकवली पोलिसात नोंद नव्हती.