स्व. भाईसाहेब सावंत यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली

Edited by: विनायक गावस
Published on: February 04, 2024 15:27 PM
views 152  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री स्व. भाईसाहेब सावंत यांच्या माजगाव येथील समाधी स्थळावर शंभराव्या जयंती निमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे सुपुत्र तथा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते ही आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्व. भाईसाहेब सावंत यांच्या आठवणींना उजाळा देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी भाईसाहेब आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे पदाधिकारी यांनी समाधीस्थळी अभिवादन केल. यावेळी शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी.एल.नाईक, अमोल सावंत, अर्चना सावंत, कबीर सावंत, सतीश बागवे, बाळासाहेब नंदीहळ्ळी, नारायण देवरकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपप्राचार्य डॉ सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक अरविंद साळगावकर, प्रविण बांदेकर, एस. एन.पाटील, बी.एस.पाटील, के.टी.परब, शैलेश‌ नाईक, आर.व्ही. बोडके तसेच आरपीडीचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरपीडी हायस्कूल सावंतवाडी, दोडामार्ग हायस्कूल व चौकुळ हायस्कूलमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले. लवकरच भाईसाहेब सावंत यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.