स्व. भाईसाहेब सावंत यांना जयंतीनिमित्त वाहण्यात आली आदरांजली !

यावर्षी जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविणार विविध उपक्रम
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 05, 2023 11:44 AM
views 383  views

सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव येथील स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून भाईसाहेब सावंत यांची ९९ वी जयंती त्यांचे सुपुत्र तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांच्याहस्ते साजरी करण्यात आली. यावेळी नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी व स्कूल कमिटी अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संस्थेचे सचिव सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, बाळासाहेब नंदीहळ्ळी, रवींद्र म्हापसेकर, सतीश बागवे, अमोल सावंत, सोनाली सावंत, सौ.अर्चना अमोल सावंत, प्रा. नारायण देवकर, प्रा. धीरेंद्र जाधव होळीकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड, दोडामार्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक शैलेश नाईक, माजी मुख्याध्यापक कृष्णा परब, प्रल्हाद सावंत, देविदास कोरगावकर, प्रा. राहुल कदम, संदीप सुकी, संजय कानसे, मनोहर

वेंगुर्लेकर, तसेच भाईसाहेब सावंत यांचे पणतू कुमार कबीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली. 


जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविणार विविध उपक्रम

दरम्यान, भाईसाहेब सावंत यांची ९९ वी जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. यावेळी स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे यावर्षी भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्यात येईल, असे नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी डॉ. दिनेश नागवेकर यांनी सांगितले.