स्व. प्रकाश परब स्मृतीप्रित्यर्थ भजन स्पर्धा...!

Edited by: विनायक गावस
Published on: August 25, 2023 14:02 PM
views 171  views

सावंतवाडी : स्व. प्रकाश परब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिपक केसरकर पुरस्कृत तळवडे ग्रामस्थ आयोजित श्री सिद्धेश्वर मंदिरात शनिवार २६ ॲागस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत जिल्ह्यातील निवडक सात भजन संघांचा सहभाग आहे. दत्तप्रसाद भजन मंडळ -वर्दे ( बुवा - नरेंद्र मेस्री),सद्गगुरुनाथ भजन मंडळ-तुळस ( बुवा- सिद्धेश नाईक),श्री देव रवळनाथ भजन मंडळ - पाडलोस ( बुवा- अजित गावडे),श्री दत्तगुरु भजन मंडळ- वैभववाडी ( बुवा- विकास नर),श्री सनामदेव भजन मंडळ -सांगेली ( बुवा-सनम खेमराज),श्री रवळनाथ भजन मंडळ- पिंगुळी ( बुवा-रुपेश यमकर),स्वारधारा भजन मंडळ-तांबोळी ( बुवा -अमित तांबोळकर) यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १११११ सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, द्वितीय ७००० सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, तृतीय ५००० सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, उत्तेजनार्थ ३००० व इतर बक्षिसे उकृष्ट पखवाजवादक, गायक,तबला,हार्मोनियम,झांजवादक प्रत्येकी १००० व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

तसेच प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॅा आयोजित करण्यात आला आहे.त्यासाठी बक्षिसे - फॅन, इस्री, कुकर,ब्ल्यूटूथ स्पीकर,लेमन सेट,थर्मास अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी (सुरज परब मो. ९६२३६२०१०४ व रोहित परब यांच्याशी संपर्क साधावा. भजनप्रेमी,ग्रामस्थ तसेच सर्व सहकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महेश परब व दिनेश परब यांनी केले आहे.