अँड. विक्रम भांगले यांची आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: January 29, 2025 15:38 PM
views 199  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि नेमबाजी या खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक अँड. विक्रम भांगले यांची उत्तराखंड डेहराडून येथे सुरु झालेल्या 38 व्या नॅशनल गेम्स या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. या स्पर्धेतचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते झाले.

अँड.भांगले हे सुप्रिम कोर्ट ऑफ इंडियाचे वकील असून यांनी आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स अशा अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धामध्ये जुरी , प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी तसेच आयोजन समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.