सालईवाडा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन !

Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 16:26 PM
views 94  views

सावंतवाडी : कोकणातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या सालईवाडा गणेशोत्सव मंडळाच यंदा ११८ व वर्ष असून यानिमित्तानं विविध कार्यक्रमांच आयोजन मंडळाकडून करण्यात आलं आहे. 

यामध्ये उद्या सोमवारी सायंकाळी ४ ते ७ रांगोळी स्पर्धा, मंगळवार  ३ ऑक्टोबरला सायंकाळी ४ ते ७ पाककला स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता सामूहिक अथर्वशिष्य पठण, बुधवार दिनांक ४ ऑक्टोबरला सायं. ५ वाजता कणकवली येथील महिलांचा महासत्संग, रात्रौ ९ वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम, गुरुवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ गायन स्पर्धा, शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दुपारी माजी नगरसेवक राजाराम मोतिराम स्वार यांचा महानैवेद्य, सायंकाळी ४ ते ७ श्री चरणी मोदक अर्पण व हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ९ वाजता भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

तर शनिवार दिनांक ७ ऑक्टोबरला सायंकाळी ४ ते ७ वेशभुषा स्पर्धा, रविवार दिनांक ८ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १.०० वाजता आरती, महाप्रसाद व तिर्थप्रसाद, रात्री बक्षिस वितरण समारंभ, भजन कार्यक्रम तर २१ व्या दिवशी सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्री आदीनारायण मंगल कार्यालय यांचे अथर्वशिष्य आर्वतन व नैवेद्य

सायंकाळी ५ वाजता महाआरती व गा-हाणे तदनंतर सायंकाळी ६. वाजता श्रींच्या विर्सजन मिरवणूकस प्रारंभ होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आल आहे.