साळशीतील वैष्णव कदम यांची SRPF मध्ये निवड

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 18, 2024 06:02 AM
views 402  views

देवगड : देवगड तालुक्यातील साळशी – सरमळेवाडी येथील वैष्णव विलास कदम यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्र.८ (गोरेगांव) मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदी नेमणूक करण्यात आली आहे. वैष्णव कदम यांचे प्राथमिक शिक्षण साळशी येथे होऊन देवगड महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

त्याने सन २०१९ पासून होमगार्डमध्ये स्वयंसेवक म्हणून ४ वर्षे सेवा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी संरक्षण विभागात त्याने लिपिक म्हणून केले होते. त्याने ऑगस्टमध्ये मुंबई – गोरगांव येथे पोलीस भरतीची परीक्षा दिली.त्यात लेखी व मैदानी परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्याची सशस्त्र पोलीस शिपाई पदी निवड झाली आहे. त्याच्या निवडीबद्दल वैष्णवचे व त्याच्या कुटुंबियांचे साळशी ग्रामवासीयांनी अभिनंदन केले आहे.