'नवोदय' प्रवेश परीक्षेत शौर्य बोडेकरची निवड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2024 05:06 AM
views 117  views

वैभववाडी : केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्रता परीक्षेत येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचा विद्यार्थी शौर्य चेतन बोडेकर याची पहिल्या यादीमध्ये निवड झाली आहे. शौर्य हा मालवणी कवी व एडगाव रामेश्वर शाळेचे मुख्याध्यापक चेतन बोडेकर यांचा चिरंजीव आहे.

तालुकास्तरावर यापुर्वीही शौर्य याने लांबउडी, उंचउडी, कबड्डी यांसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच वक्तृत्व, वेशभूषा, बालकांच्या नृत्य स्पर्धांमध्येही त्याने यश मिळविले आहे. ऋषिकेश चौगुले, पंढरीनाथ कांबळे, पांडुरंग कोकरे, उदय गोसावी, सारिका सासणे, आरुषी बोडेकर, शीतल पाटील, राजेश कळसुळकर, सायली सबनीस यांचे मार्गदर्शन लाभले.

नवोदयसाठी निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे,  मुख्याध्यापक भास्कर नादकर,  केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव यांनी त्याचे अभिनंदन केले.