
वैभववाडी : सांगुळवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी सचिन जयसिंग रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.निवडीनंतर सरपंच व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
सांगुळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच ग्रामसभा संपन्न झाली.या सभेत गावातील तंटामुक्ती समिती नव्याने गठीत करण्यात आली.अध्यक्षपदासाठी सचिन रावराणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.निवडीनंतर त्यांचं अभिनंदन करण्यात आले.यावेळी बोलताना श्री रावराणे म्हणाले, गावातील सर्वांना सोबत घेऊन काम करेन.गावक-यांनी ठेवलेला विश्वास सार्थकी लावेन.