संदेश तुळसणकर यांची असोसिएट एनसीसी ऑफिसर पदी निवड

संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन तुळसणकर यांचे केले अभिनंदन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 11, 2024 09:27 AM
views 214  views

वैभववाडी : अर्जुन रावराणे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक  संदेश तुळसणकर यांनी एनसीसी ऑफिसर रँक प्राप्त केली.नुकत्याच नागपूर येथील कामठी येथे राष्ट्रीय छात्र सेना ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चा एनसीसी ऑफिसर  दीक्षांत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री. तुळसणकर यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

देशभरातील शिक्षकांसाठी नागपूर येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने दोन महिन्यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते.या प्रशिक्षणासाठी  वेगवेगळ्या राज्यातील शिक्षक उपस्थित होते.यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण ,शारीरिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास ,मॅप रीडिंग ,फायरिंग, ड्रिल, एडवेंचर, विविध खेळ, कॅम्प प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन ,योगा आणि सैनिकी तथा सामाजिक जनजागृती याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. मेजर जनरल राजेशकुमार सचदेवा, ॲडिशनल डायरेक्टर जनरल जम्मू-काश्मीर अँन्ड लडाख डायरेक्टर यांनी यावेळी प्रशिक्षित शिक्षकांना मार्गदर्शन केले.हे दोन महीन्याचे प्रशिक्षण यशस्वीपणे श्री तुळसणकर यांनी पुर्ण केले.त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना एनसीसी अधिकारी पदाची पदवी प्रदान करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी प्रशालेचे प्राचार्य .बी.एस.नादकर , पर्यवेक्षक पी.एम.पाटील , माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस.पाटील व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. शिक्षणसंस्थेने केलेल्या सत्कारानंतर श्री तुळसणकर म्हणाले, माझे संस्थेने केलेले स्वागत पुढील काळात काम करण्यास ऊर्जा देणारे आहे. तसेच भविष्यात माझ्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील देश सेवेसाठी तत्पर ग्रामीण भागातील एनसीसी विद्यार्थी तयार होतील असा विश्वास  श्री. तुळसणकर यांनी व्यक्त केला.