नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या अर्फात चौगुलेची कॅरम स्पर्धेसाठी निवड

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 15, 2023 19:36 PM
views 137  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल  नडगिवे  येथील इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी अर्फात चौगुले याची 14 वर्षाखालील मुले या गटात विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा 2023-24 मध्ये कॅरम स्पर्धेत अर्फात याने  पाचवा क्रमांक पटकावला असून त्याला विभागीय कॅरम स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

त्याच्या या यशाचे शाळेतील मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, सीईओ नीता शुक्ला तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शाळेतील क्रीडा शिक्षक अमोल चौगुले व सुयोग राजापकर यांच्यावरही कौतुकांचा वर्षाव होत आहे.