भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक - बजाज ऑटोमध्ये निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2024 06:12 AM
views 178  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची जनरल इलेक्ट्रिक व बजाज ऑटो या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये जनरल इलेक्ट्रिक या बहुराष्ट्रीय कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी १९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून बजाज ऑटो या कंपनीमध्ये ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हे सर्व विद्यार्थी जुलै महिन्यापासून दोन्ही कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पावर रुजू होतील अशी माहिती कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.मिलिंद देसाई यांनी दिली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.