
सावंतवाडी : सावंतवाडी येथील शिक्षक भारती सिंधुदुर्गचे सहसंघटक, कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचे विद्यार्थी प्रिय, सेवाज्येष्ठ शिक्षक, संतोष वैज आणि ओटवणे येथील जि. प. प्राथमिक शाळा क्रमांक ३ च्या शिक्षिका स्नेहप्रभा वैज यांचा मुलगा अभिनव वैज यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2022 मधून तालुका कृषी अधिकारी राजपत्रित गट ब (वरिष्ठ) कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या पदी निवड झाली आहे.
अभिनव व त्याच्या आईवडील यांचे सर्व स्तरावरून हार्दिक अभिनंदन होत असून अनेक मान्यवरांनी अभिनवला पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.