
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ५५ विद्यार्थ्यांची आयएफबी, जीई, केएसपीजी आणि विप्रो या नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. कॉलेजमध्यें आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड झाली. यामध्ये होम अप्लायन्सेस बनविणाऱ्या आयएफबीमध्ये १७, जनरल इलेक्ट्रिक १४, वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या केएसपीजी ऑटोमोटिव्ह मध्यें २२ आणि विप्रोमधील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हे सर्व विद्यार्थी कॉलेजच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख मिलिंद देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले. या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.