
वैभववाडी : तिथवली - दिगशी गृप ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी साजिद काझी यांची निवड झाली.नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही बिनविरोध निवड झाली. तिथवली -दिगशी गृप ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली.यावेळी नव्याने तंटामुक्त समिती जाहीर करण्यात आली.या समितीच्या अध्यक्ष पदी श्री.काझी यांची निवड झाली.निवडीनंतर सरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन श्री.काझी यांच अभिनंदन करण्यात आले. यानंतर बोलताना श्री. काझी म्हणाले, संपूर्ण गावाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे पार पाडेन.गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन. यावेळी सरपंच प्रियांका हरयाण,उपसरपंच चंद्रकांत पाष्टे, ग्रामपंचायत सदस्य ओमकार हरयाण ,सौ.सायली धुरी, रिहाना काझी, चित्रा हरयाण, सुरेश हरयाण यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.