सावंतवाडी डेपोतील परिस्थिती पाहून अर्चना घारेंचा संताप !

तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा
Edited by:
Published on: June 12, 2023 20:12 PM
views 137  views

सावंतवाडी : सावंतवाडी एसटी डेपोची अवस्था व प्रवाशांचे होणारे हाल पाहून राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंनी संताप व्यक्त करत डेपो मॅनेजरला खडेबोल सुनावलेत. सर्वत्र घाणीच साम्राज्य असून हिरकणी कक्षाची अवस्था दुर्दैवी आहे. सरकार फक्त  जाहिरातीसाठी एसटीचा वापर करत आहे. प्रवाशांचा हिताच त्यांना काही पडलेलं नाही. येत्या आठ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीच्या अर्चना घारेंनी दिला आहे.

डेपो मॅनेजर नरेंद्र बोधे यांना त्यांनी धारेवर धरत खडेबोल सुनावले. सावंतवाडी डेपोत पाऊल ठेवल्या ठेवल्या रस्त्यावरील खड्डे, चिखल, कचरा पाहता आरोग्याच्या दृष्टीने घाणीच साम्राज्य पहायला मिळत आहे.  गॅरेजमध्ये पाणी, लिकेज इमारती पाहता प्रवाशांसह कर्मचारी वर्गाची गैरसोय होत आहे. येथील कचरा नगरपालिकेकडून उचलला जात नाही. तो का जात नाही ? याचा देखील समाचार घेऊच.  डेपोसह सर्वत्र खड्डे धुळीचे साम्राज्य पाहता गावातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही आहे. हिरकणी कक्ष, पोलीस कक्ष बंद आहेत. शासनाच्या गाड्यांचा उपयोग फक्त जाहिराती करण्यासाठी केला जातो आहे. लोकांच्या पैशातून जाहिराती करत प्रवाशांना सोयी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे महिलांच तिकीट निम्मं करून काय उपयोग आहे ? स्वच्छ आरोग्य नाही सुविधा नाही  तर त्याचा फायदा काय ? असा सवाल अर्चना घारेंनी केला. दहा वर्षापूर्वींचा जो डेपो होता तो आता राहीलेला नाही. इथले लोकप्रतिनिधीनी याला जबाबदार असून एसटीचे कर्मचारी आहे त्या परिस्थितीत काम करत आहेत. त्या सुविधा पुरविण्याच काम सरकारच आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर नागरीकांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घारेंनी दिला. 

यावेळी राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, जिल्हा निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी, इफ्तिकार राजगुरू, वैभव वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.