नरेंद्र डोंगरावर बीजारोपण - वृक्षारोपण अभियान

Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2025 13:31 PM
views 88  views

सावंतवाडी : भारतीय किसान संघ व अभिनव फाउंडेशन, सावंतवाडी यांच्यावतीने नरेंद्र डोंगर येथे बीजारोपण व वृक्षारोपण अभियान करण्यात आले. माणूस आणि वन्य प्राणी  यांच्यातील होणारा संघर्ष टाळायचा असेल तर प्राण्यांना जंगल भागातच त्याचे खाद्य मिळायला हवे असा विचार करून हा उपक्रम राबविण्यात आला. 

भारतीय किसान संघ व अभिनव फौंडेशन, सावंतवाडीच्यावतीने नरेंद्र डोंगर सावंतवाडी येथे बीजारोपण व वृक्षारोपण अभियान राबविले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आंबा, फणस, कोकम, चिंच अशा फळझाडांच्या बिया जंगलात रोवल्या. सावंतवाडी नगरपालिका यांनी माझी वसुंधरा अभियानातून उपलब्ध करून दिलेली तिरफळ,आवळा, वड , चिंच अशी झाडे लावली. तसेच सिडबॉल विखुरण्यात आले. यावेळी वनविभागाचे आरएफओ सौरभ पाटील उपस्थित होते.या अभियानात राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदु परिषदेच्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले सहभागी झाली.दरवर्षी असा कार्यक्रम करायचा संकल्प घेऊन कार्यक्रम समाप्त झाला.