
सावंतवाडी : आंबोली कावळेसाद येथे दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कर्मचारी राजेंद्र बाळासो सनगर, वय ४५, रा. कोल्हापूर यांचा शोध घेण्यासाठी शनिवार सकाळपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी कावळेसाद येथे तोल जाऊन ते ३०० फूट खोल दरीत कोसळले होते. दाट धुके आणि अंधारामुळे त्यांना शुक्रवारी रात्रीपर्यंत शोधता आले नव्हते. ही थांबलेली मोहीम आज सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. शोध आणि बचावकार्य सुरू असेपर्यंत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कावळेसाद हे पर्यटन स्थळ स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले आहे.