
कणकवली : सध्या सिंधुदुर्गात सुरु असलेल्या विज्ञान सहलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. सावंत फाऊंडेशन संचलित डॉ. रमेश सांस्कृतिक विज्ञान केंद्र कळसुली आणि गोवा विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या विज्ञान सहलीच आयोजन करण्यात आलंय.
नाटळ हायस्कूलमध्ये या सहलीचं आगमन झालं. दोन दिवस चालणाऱ्या या सहलीमध्ये सर्व गोवा विज्ञान केंद्राचे एज्युकेशन ट्रेनर व सावंत फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका, संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुलांना गोवा विज्ञान केंद्राचे उगम पडलोस्कर यांनी मार्गदर्शन केले.