सिंधुदुर्ग : सावंत फौंडेशन संचलित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र ,कळसुली आणि गोवा विज्ञान केंद्र, मिरामार संयुक्तरित्या आयोजित कार्यक्रम "विज्ञान सहल" सिंधुदुर्गातील कणकवली, कुडाळ, आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण 15 शाळांमध्ये 21 नोव्हेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 महिन्या मध्ये आणि शैक्षणिक वर्षातील शेवटच्या महत्वाच्या टप्प्यावर एकत्रित संयुक्तपणे आयोजित कार्यक्रम , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये सायन्स प्रदर्शन, प्रात्यक्षिक, आकाश दर्शन व विज्ञान विषयावर फिल्म व चर्चा आयोजित करण्यात येत आहेत.
गोवा विज्ञान केंद्र, मिरामार हे राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, सरकारचे एक घटक आहे. भारताचे. सामान्य लोकांमध्ये विज्ञान लोकप्रिय करणे आणि तरुण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करणे हा केंद्राचा तसेच डॉ रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्राचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी संवादात्मक प्रदर्शने आणि इतर शिक्षण विस्तार कार्यक्रमांद्वारे विज्ञान शोधण्यासाठी एक परिपूर्ण वातावरण प्रदान करते. केंद्राकडे फिरते विज्ञान प्रदर्शन युनिट देखील आहे, जे दुर्गम भागातील शाळांच्या गरजा पूर्ण करते. युनिटमध्ये "मानवी शरीरशास्त्र आणि सामान्य विज्ञान" नावाचे नवीन प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन एका बसमध्ये बसवण्यात आले असून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार प्रत्येक ठिकाणी दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली हे गेली वीस वर्षे सिंधुदुर्गामधील विविध शाळांमध्ये विज्ञान विषयक कार्यशाळा व शैक्षणिक उपक्रम आयोजित करत आहेत.
विज्ञान विषयावर अनेक शैक्षणिक कार्यक्रम आहेत जसे की सायन्स फिल्म शो, सायन्स प्रात्यक्षिक व्याख्याने आणि आकाश निरीक्षण कार्यक्रमादरम्यान आयोजित केले जातात. त्यासाठी काही शाळांनी अगोदरच आपली नावं नोंदणी केली आहे. याची अम्मल बजावणी या दिवसात होत आहे
यासाठी सावंत फौंडेशन तर्फे प्रोजेक्ट कोऑर्डिनेतर म्हणून रामचंद्र राणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यांचा संपर्क क्रमांक 8275187062 हा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करावा याव्यतिरिक्त [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा आणि लवकरच उर्वरित तालुक्यातही हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे . आपलं सहकार्य असेच आम्हाला लाभू द्या व विद्यार्थ्यांना हा ज्ञानाचा पुरेपूर आस्वाद घेऊया, असं आवाहन सावंत फौंडेशनचे सचिव शरद सावंत यांनी केलं.