मुणगेत ‘सायन्स ऑन व्हील्स’ !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 14, 2023 19:26 PM
views 92  views

देवगड : गोवा सायन्स सेंटरच्या वतीने ‘सायन्स ऑन व्हील’ हा उपक्रम मुणगे येथील श्री.भगवती हायस्कूल आणि कै.वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे आयोजित करण्यात आला होता.


'सायन्स ऑन व्हील’ या उपक्रमांतर्गत भगवती हायस्कूलमध्ये २० पेक्षा अधिक विज्ञान प्रतिकृती दाखविण्यात आल्या. तसेच त्यांची माहिती देण्यात आली. त्यासोबत विविध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सायन्स ऑन व्हील अर्थात फिरती विज्ञान शाळा उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांनी लक्ष वेधले होते. मुणगे सह हिंदळे, पोयरे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी देखील या उपक्रमास भेट देऊन लाभ घेतला. कार्यक्रमासाठी गोवा सायन्स सेंटरचे तज्ञ मार्गदर्शक श्री.शिवसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, सहायक शिक्षक एन. जी. वीरकर, प्रसाद बागवे,प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर, सौ. मिताली हिर्लेकर,प्रियांका कासले, एच. एस. महाले, जी. एस. तवटे, रश्मी कुमठेकर, मनोहर कडू, सुरेश नार्वेकर, नामदेव बागवे, गोवा सायन्स सेंटरचा सहायक प्रशिक्षक वर्ग इत्यादी उपस्थित होते.