
कणकवली : सावंत फाउंडेशन संचालित डॉ.रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली आयोजित 21 ते 23 डिसेंबर रोजीच टोपीवाला हायस्कुल मालवण येथील विज्ञान शिक्षक प्रशिक्षण 'प्रयोगातून विज्ञान' कार्यशाळा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. याचं कालावधीत शाळांमध्ये सुरू असणारे विज्ञान प्रदर्शन आणि विज्ञान स्पर्धा या मुळे सर्व शिक्षक व्यस्त असल्यामुळे अत्यल्प नाव नोंदणी झाली. ही कार्यशाळा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे मालवण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील तारीख मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून ठरवली जाईल आणि पुन्हा पत्रकाद्वारे कळविण्यात येईल याची नोंद सर्व शिक्षकांनी घ्यावी असं आवाहन सावंत फाउंडेशन सेक्रेटरी शरद सावंत यांनी केलं आहे.










