तळेबाजार हायस्कूल येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न!

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांच्या हस्ते झाले उद्घाटन!
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 05, 2023 23:26 PM
views 284  views

देवगड : तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल तळेबाजार प्रशालेत ५० वे देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत  उत्साहात संपन्न झाले.

 या विज्ञान प्रदर्शन व विज्ञान प्रतिकृती कक्षाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले, देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जंगले, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, तळेबाजार शिक्षण प्रसारक मंडळ तळेबाजारचे संस्था अध्यक्ष संदीप तेली, तळेबाजार हायस्कूलचे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक रघुनाथ घोगळे, संस्था उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सचिव कृष्णा साटम, कोळोशी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके, संस्था सदस्य विश्वास सावंत, संजय जाधव, बाळकृष्ण पारकर, केंद्रप्रमुख आनंद राजम, प्राथमिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, विज्ञान प्रेमी, पालक आदी उपस्थित होते.

 या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून १९, माध्यमिक विभागातून ६६, विद्यार्थी प्रतिकृती, शिक्षक प्रतिकृती १३, परिचय प्रतिकृतीही मांडण्यात आल्या होत्या. तसेच यावेळी निबंध स्पर्धेत ५६ व वक्तृत्व स्पर्धेत ३८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापक घोगळे व  स्वागताध्यक्ष संदीप तेली यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी केले. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'विज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा असून विज्ञानाची कास धरून चालल्यास आपली प्रगती आपल्या हातात आहे. आपले भविष्य भविष्य उज्वल होईल.' असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भोसले म्हणाले. तसेच 'विद्यार्थी हा चौकस असावा, त्याने आपल्या सभोवतालचा परिसर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले. शाळेतील मुलांची शिस्त, स्वच्छ परिसर, चांगले उपक्रम राबवणारी शाळा, शैक्षणिक गुणवत्ता वाढ उपक्रम राबवणी शाळा, सुंदर नियोजन अशा शब्दात त्यांनी  प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सर्व संस्था पदाधिकारी यांचे कौतुक देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्रकुमार चव्हाण यांनी  तर आभार गुरुनाथ तेली यांनी मानले.