शाळा बंद होणार नाहीत...पण | मंत्री केसरकर काय म्हणाले

Edited by: विनायक गावस
Published on: September 27, 2023 17:09 PM
views 139  views

सावंतावडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा बंद होणार नाहीत तर खाजगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून आधुनिकीकरण करता येईल का? याबाबत चाचपणी सुरू केली जात आहे असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. शाळा बंद होणार म्हणून कोणीही अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करू नये असे त्यांनी आवाहन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद होणार ही चुकीची माहिती आहे एकही शाळा बंद होणार नाही अशी माहिती राजाचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर दिली. शाळा बंद होणार अशा प्रकारची चुकीची अफवा पसरवली जात आहे तर शाळेबाबतचा सर्वे करण्याचा आदेश देण्यात आले आहेत कारण शाळेमध्ये किती मुलं आहेत त्यांना चांगले शिक्षण देता येण्याकरिता हा सर्वे आहे एका शाळेमध्ये दोन तीन मुलं असतील तर ती एकत्र खेळूही शकत नाहीत याबाबतचा सर्वे आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले. बऱ्याचश्या कंपनीचा सीएसआर फंड असतो हा सी एस आर फंड एकतर आरोग्य किंवा शिक्षण यावर खर्च करतात हे सर्व पैसे एनजीओकडे जातात मग ते शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करतात याचा कुठलाही फायदा विद्यार्थ्यांना होत नाही, त्यामुळे या पैशाचा वापर जुन्या झालेल्या शाळांच्या दुरुस्ती तसेच विविध शाळांच्या कामांसाठी कंपन्या देऊ शकतात यासाठी सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सर्व पगार आम्ही देणार आहोत त्यामुळे शाळा बंद होणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असून कोणताही अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षणावर खर्च होणारा पैसा केवळ व्हिडिओ, पत्रके छापणामध्ये खर्च केला जाऊ नये या ऐवजी मुलांना चांगल्या टॉयलेट,शाळेला कंपाउंड वॉल, चांगल्या ब्रेचेंस चांगली इंटरनेट सुविधा, टीव्ही कॉम्प्युटर लॅब देता आल्या तर त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे त्यामुळे शाळा बंद होण्या बाबतच्या कोणत्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जाऊ नयेत असे आवाहन त्यांनी केले आहे.