वेंगुर्ले बंदर दुर्घटने प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली बाबी रेडकर यांची भेटी

Edited by: दिपेश परब
Published on: May 25, 2024 13:25 PM
views 182  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला बंदर येथे वादळी वाऱ्यामुळे छोटी होडी बुडून झालेल्या २३ मे रोजी रात्री झालेल्या दुर्घटनेत दाभोसवाडा येथील बाबी रेडकर यांच्या लॉन्च वर काम करणाऱ्या ४ खलाश्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आज २५ मे रोजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी मच्छिमार बाबी रेडकर यांची त्यांच्या घरी भेट घेऊन विचारपूस केली. 

यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, अतिशय दुर्दैवी असा हा प्रसंग घडला आहे. यावेळी ज्या पद्धतीने बाबी रेडकर यांनी त्या लोकांना मदत केली हे कौतुकास्पद आहे. मयतांचे मृतदेह त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना मदत ही शासनाच्या वतीने देण्यात येतील. ही लोक जरी राज्य बाहेरील असतील तरी याठिकाणी काम करताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे त्यांना जी काय मदत करता येईन ती केली जाईल. याठिकाचा ब्रेकवॉटर प्रकल्प हा महत्वाचा प्रकल्प असून त्यामुळे समुद्रातील लाटेचा प्रभाव कमी होणार आहे. मच्छिमारांसाठी अनेक योजनक राबवत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला याच मला वाईट वाटत. या भागाचा प्रतिनिधी व आमदार म्हणून नेहमीच मी बाबी रेडलर व सर्व मच्छिमारांच्या पाठीशी ठाम उभा आहे. अशी अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, सूरज परब, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.