सिंधुदुर्गातील शाळा -महाविद्यालयांना मंगळवारीही सुट्टी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 08, 2024 17:22 PM
views 165  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,सर्व आश्रम शाळा व सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आज मंगळवार दि.९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिला आहे.

    प्रादेशिक हवामान विभागाच्या पुर्व सूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून,संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.तसेच आपती व्यवस्थापन अधिनियम २००५ व दिनांक ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,सर्व आश्रम शाळा व सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आत मंगळवार दि.९/७/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


      हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिनांक ९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.पुढील चार दिवसात  जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवारी दि. ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.