शासनाच्या प्रयोगवह्यांपेक्षा खासगी प्रयोगवह्यांना प्राधान्य

Edited by: विनायक गावस
Published on: June 29, 2024 15:25 PM
views 79  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती बालभारतीकडून मुलांच्या शिक्षणासाठी योग्य किंमतीत इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विज्ञान प्रयोगवह्या जलस्वराज्य, संरक्षणशास्त्र उपलब्ध केलेल्या असतात. काही शाळांमधून इतर प्रकारच्या दुप्पट किंमत असलेल्या वह्या शासनाच्या वहीपेक्षा काही शाळा कॉलेजमधून लावतात व विक्रीस उपलब्ध करतात त्यामुळे पालकांना नाहक भुर्दंड पडतो.


शासनाच्या प्रयोगवह्यांची किंमत इयत्ता दहावी विज्ञान रु.४९/-, संरक्षण शास्त्र रु४३/-, जलस्वराज्य नोंदवही रु.५७/- इयत्ता बारावी भौतिकशास्त्र प्रात्यक्षिक नोंदवही रु.११२/-, रसायनशास्त्र रु.९५/-, जीवशास्त्र- रु.९९, गणित व संख्याशास्त्र रु.६८/-अशा किंमती आहेत. इतर कंपनीच्या प्रयोगवह्या प्रत्येकी दुप्पट दराच्या किंमतीच्या आहेत.


जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पाच वर्षापूर्वी शासनाच्या मान्यताप्राप्त प्रयोगवह्या व नोंदवही लावावी असे कळविण्यात आलेले होते. याची अंमलबजावणी झालेली आहे. पण काही शाळांमधून इतर कंपनीच्या जादा किंमतीच्या वह्या मुलांना देण्यात येत आहेत. त्यामुळे पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत लक्ष घालून पालकांना होणारा भुर्दंड वाचवावा अशी मागणी पालकांकडून होत आहे.