शिष्यवृत्तीत शिरगांव हायस्कूलच्या 7 विद्यार्थ्यांची निवड

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 04, 2024 10:45 AM
views 137  views

देवगड : देवगड तालुक्यातील शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत शिरगांव हायस्कूलच्या ७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिरगांव हायस्कूल च्या ७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत इयत्ता ५ वी मधील स्वरा यीगेश पाकले  हिचा जिल्हातील सर्वसाधारण यादीत ८ वा क्रमांक प्राप्त झाला असून अंश सखाराम तेली याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत १३ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तर इयत्ता ८ वी तील अथर्व बापू खरात याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत १६ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तर कुणाल महेश चौकेकर, जिल्हा सर्वसाधारण यादीत ३१ वा. क्रमांक मिळवला आहे. तर कार्तिक महेश चौकेकर याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत ५९ क्रमांक प्राप्त  झाला आहे.

तर सृष्टी सखाराम तेली : तालुका यादीत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच मनस्वी सचिन मिस्त्री हिचा तालुका यादीत तिसरा क्रमांक प्राप्त तसेच या शिष्यवृत्ती परीर्क्ष्येत शिरगावचे हायस्कूल चे इयत्ता ५ वी मध्ये २ विद्यार्थी व इयत्ता ८ वी मध्ये ५ विद्यार्थी असे एकूण ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. या सर्व यक्षस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.