'शिष्यवृत्ती'त अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश !

चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 04, 2024 07:53 AM
views 67  views

वैभववाडी : राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने  घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक  शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यालयाचे ४विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.

    शासनाच्यावतीने मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामधील पुर्व प्राथमिकसाठी झालेल्या परीक्षेत प्रशालेचे आयुष नाळे, तनिष्का बुराण, वेदांत सरकटे व ओम शिंदे हे  चार विद्यार्थी  गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेणे गरजेचे आहे.तसेच शासनाच्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अशा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होणं महत्वाचं आहे. भविष्यात उज्वल आयुष्य घडविण्यासाठी या परीक्षा महत्त्वाच्या आहेत असं मत जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. 

यावेळी मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक एस बी शिंदे, लिपिक पी.पी.कोकरे आदी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.