
सावंतवाडी : शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२४ मध्ये सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या विदयार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती पटकावत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली.
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.५वी) प्रशालेचे १४ विदयार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून कु. रूणाली शेखर चितारी (तालूका रॅन्क ६), कु. प्रतिक प्रदिप देसाई (तालूका रॅन्क ९), कु. अनय संतोष दळवी (तालूका रॅन्क १२), कु. आराध्या राजेंद्र गावडे (तालूका रॅन्क १६), कु. स्वरूप संजय राउळ (तालूका रॅन्क १९) हे शिष्यवत्तीचे मानकरी ठरले. तर पूर्व माध्यमिक शिष्यवत्ती परीक्षेत (इ.८वी) १० विदयार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कु. काव्या विशाल अपराध (तालूका रॅन्क १६) ही शिष्यवत्तीची मानकरी ठरली. यशस्वी विदयार्थ्यांना श्रीम. प्रेरणा भोंसले, गोविंद प्रभू, श्रीम. फरजाना मुल्ला, योगेश चव्हाण, श्रीम.प्रज्ञा नार्वेकर, श्रीम. प्रणिता मयेकर या शिक्षकांचे व मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रदधाराजे भोंसले व संस्थेचे सदस्य, तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघ व माता पालक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी कौतूक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.