
सावंतवाडी : न्यू इंग्लिश स्कूल मडूरा ता.सावंतवाडी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सायली सत्यवान परब यांची महाराष्ट्र राज्य माध्य.व उच्च माध्य.शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दिला जाणार्या राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार वितरण समारंभ दि.१२ व १३ एप्रिल २०२५ या कालावधीत दापोली जि.रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्था अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक,संस्था समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, संस्था कार्यकारणी सदस्य, संस्थाच्या भगिनी प्रशालेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कुडासे व मडूरा पालक शिक्षक संघ, ग्रामस्थ यांनी सायली परब मॅडम यांचे अभिनंदन केले.