सावर्डे विद्यालयाकडून वैकुंठभूमीची स्वच्छता

Edited by: मनोज पवार
Published on: January 21, 2025 19:01 PM
views 53  views

सावर्डे : स्वच्छतेचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. निरोगी जीवनाला व पर्यावरण संवर्धनासाठी स्वच्छता अत्यंत उपयुक्त आहे. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक स्वच्छतेसह पाणवठा स्वच्छता, मंदिर, मशीद स्वच्छता, रस्ते परिसर स्वच्छता अशी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असणे  अत्यंत गरजेेचे आहे.  कृतीद्वारे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे समाजामध्ये स्वच्छतेचे विषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. गांधी तीर्थ जळगाव यांच्या स्वच्छता उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. 

अनेकवेळा सर्वांना एकत्रित जावे लागते असे सार्वजनिक ठिकाण  म्हणजेच स्मशानभूमी स्वच्छते  पासून वंचित राहिलेली आपल्याला आढळते.

विद्यालयातील  शिक्षक संदीप पवार आपल्या पत्नीसह  गेली 22 महिने प्रत्येक महिन्याच्या तीस तारखेला स्मशानभूमी स्वच्छ करताना दिसतात. काही अपेक्षा, मदत न मागता, प्रसिद्धी न करता सातत्याने त्यांचे  स्वच्छता  काम सुरु आहे. स्मशानभूूमी सारखे सार्वजनिक  ठिकाण स्वच्छ असायला हवे,  असा विचार करत, आणि  विद्यालयाचे शिक्षक संदिप पवार उभयतांस यांना साथ देत, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांच्या  सहकार्याने सावर्डे वैकुंठभूमी स्वच्छ करून नागरिकांसमोर आदर्श ठेवला आहे.