
सावर्डे : स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, थोर विचारवंत, सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य सुदृढ कुटुंब व्यवस्थेसाठी विषय उपयुक्त असून महिलांना आत्मनिर्भर बनवणारे व सन्मानाने जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. गरीब, शोषित आणि वंचित घटकांना शिक्षणामुळेच मुख्य प्रवाहात सामील होता येते असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी याप्रसंगी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्रचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या शुभहस्ते ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. याप्रसंगी श्रावणी राठोडने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याची ओळख ओळख करून दिली तर मणिकर्णिका गुडेकरने ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर स्वरचित कविता सादर केली व उपस्थितांचे वाहवा मिळवली. शिक्षक मनोगतामध्ये नेहा मेस्त्री यांनी ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्या कार्याची ओळख करून देताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी निर्माण केलेले विपुल ग्रंथसंपदेची माहिती दिली. सहाय्यक शिक्षिका नेहा मेस्त्री व मनोज कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या हस्ते पार पडले. नेहा मेस्त्री उपस्थितांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली.