
सावर्डे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कोकण विभगीय शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आयोजनाची तयारी गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे केंद्र क्रमांक 0623 येथे पूर्ण झाली असून सदर परीक्षा दिनांक 11/ 2/2025 पासून भयमुक्त वातावरणात होणार आहे. या केंद्रावर विज्ञान, कला,वाणिज्य व एमसीव्हीसी एच. एस.सी व्होकेशनल या शाखेतील एकूण 788= विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.
विज्ञान शाखेचे डब्ल्यू 001472 ते डब्ल्यू 001811 एकूण 339 विद्यार्थी , कला शाखेचे डब्ल्यु 010300 ते डब्ल्यु 010426 एकूण 127 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे डब्ल्यु 016500 ते डब्ल्यु 016721एकुण 222 विद्यार्थी एम सी व्ही सी शाखेचे डब्ल्यु 023536 ते डब्ल्यु 023611 एकुण 76 विद्यार्थी आणि आय टी आय शाखेचे डब्ल्यु 024303 ते डब्ल्यु 024326 एकूण 24 विद्यार्थ्यांची परीक्षा सावर्डे केंद्रावर होत असून या केंद्रात गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे, डॉ. तानाजीराव चोरगे जुनियर कॉलेज मांडकी पालवण, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वहाळ, वसंत शंकर देसाई जुनिअर कॉलेज असुर्डे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या केंद्राचे केंद्र संचालक म्हणून उपप्राचार्य विजय चव्हाण हे काम पाहत असून उपकेंद्र संचालक म्हणून हणमंत घाडगे हे काम पाहत आहेत. माध्यम निहाय व विषयानिहाय विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था बदलती राहणार असूनबपरीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात असणार आहे. सर्व परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रांवर किमान एक तास आगोदर उपस्थित रहावे. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त, गैरमार्गमुक्त व भयमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे व काही समस्या असल्यास लगेच केंद्र संचालकांना संपर्क करावा असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी केले आहे.