
सावर्डा : फलाहे दारेन सोसायटी चिपळूण संचलित अली पब्लिक स्कूल सावर्डेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सदर व्यासपीठ तयार करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने करण्यात आली या कार्यक्रमाला फलाहे दारेन सोसायटीचे अध्यक्ष मौलाना दाऊद कुदे, प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते सध्य आफ्रिकेत वास्तव्य असणारे गुलाम हुसेन चिकटे, सोसायटीचे चेअरमन खालीदभाई परकार, व्हाईस चेअरमन नाझीम भाई अफवारे, माझी नायब तहसीलदार अब्दुल मजीद माखजनकर व महाराष्ट्र हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जमालुद्दीन बंदरकर ,विस्तार अधिकारी राज अहमद देसाई, हाफिज यासीन बरमारे, ग्रामपंचायत सदस्य मैनुद्दिन खलपे, शौकत भाई महाजनकर ,अन्वर मोडक , रफिक मोडक, अब्दुल कादिर भोंबल, नजीर चिलवान, डॉक्टर समिद चिकटे, मोहीदिन उपाध्ये, मुराद खलफे उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वसीमा चिकटे यांनी शाळेच्या सर्वांगीण गुणवत्तेचा आढावा घेऊन प्रशालेस मदत करणारे आमदार शेखर निकम, शाबुद्दीन सुर्वे, मुजाहिद मेहर, इफराज भोंबल आधी मान्यवराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमास, महिला सुरक्षा काळाची गरज, पाणी आडवा पाणी जिरवा, या सामाजिक विषयावर उत्कृष्ट नाटिका सादर करून देशभक्तीपर गीतांसह विविध गीतांचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले त्याला प्रेक्षकांनी दादा देत प्रेरणा दिली. सफिनाचौगुले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.