सावंतवाडीचा सुपुत्र सीपीए इंडियाच्या कार्यकारी समितीवर

Edited by: विनायक गावस
Published on: July 08, 2023 18:44 PM
views 221  views

सावंतवाडी : राज्याचे विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील 'कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन' इंडिया रीजनच्या कार्यकारी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेच्या संचालकांनी विधानसभेच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी किंवा त्यांच्या कार्यकाळापर्यंत असेल असे म्हटले आहे. राज्य विधानसभेचे अध्यक्ष सीपीए इंडियाच्या कार्यकारी समितीमध्ये राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सीपी जोशी, अरुणाचल विधानसभेचे अध्यक्ष पीडी सोना, आसामचे सभापती विश्वजीत, उत्तराखंडच्या सभापती रितू खंडुरी, उत्तर प्रदेशचे सभापती सतीश महाना, खासदार सुनीता दुग्गल आणि लोकसभा सचिव उत्पल कुमार सिंह यांचा समावेश आहे. 


CPA इंडियाच्या कार्यकारी समितीवर नियुक्ती झाल्याचा खूप आनंद आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष डॉ. सी.पी. जोशी, अरुणाचल विधानसभेचे अध्यक्ष पासंग दोरजी सोना, आसाम सभापती बिस्वजीत , उत्तराखंड सभापती रितू खंडुरी, उत्तर प्रदेश सभापती सतीश महान, खासदार  सुनीता दुग्गल आणि लोकसभा सचिव  उत्पल कुमार सिंह यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली,त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वामध्ये एकत्रितपणे, आम्ही संसदीय संबंध मजबूत करून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचे ध्येय बाळगतो असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी केले आहे.