आ. दीपक केसरकरांमुळे सावंतवाडीची बदनामी

खरात प्रकरणी राजीनाम्याची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 13:37 PM
views 28  views

ठाकरे शिवसेनेचा मोर्चा 

सावंतवाडी : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले. केसरकर यांच्यामुळे सावंतवाडीची बदनामी झाल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केली.

या संदर्भात प्रांत अधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. श्री. राऊळ म्हणाले, भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी केसरकर यांचे संबंध आहेत. या प्रकरणामुळे सावंतवाडीच नाव खराब होत आहे. त्यामुळे त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या मोर्चात ठाकरे शिवसेनेचे चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.